विहिरीत पडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : पाय घसरून विहिरीत पडल्याने ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३) पळशी येथील पाबळवस्ती शिवारात उघडकीस पाच आली. विहिरीत आढळला पडून तब्बल पाच दिवस झाल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. 

या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल मोहणसिंग खोलवाळ (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खोलवाळ हे पाबळवाडी शेतवस्तीवर राहत होते. मंगळवारी (दि. २९) दुपारी ते घराबाहेर गेले होते. मात्र, त्यानंतर घरी परतले नाहीत. नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला; परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

शनिवारी शेजारील शेतकरी मक्याची कापणी करण्यासाठी शेतात गेले असता विहिरीजवळ त्याना दु त्यांना दुर्गंधी जाणवली. पाहणी केली असता दिवसांनंतर मृतदेह विहिरीच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ खोलवाळ यांच्या कुटुंबीयांसह पोलिसांना माहिती दिली. 

माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार दादाराव पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विहिरीजवळ धुवून वाळत घातलेले कपडे आढळून आल्याने खोलवाळ यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास बीट जमादार दादाराव पवार करीत आहेत.